Headlines

चौफुला दहिहंडीत सराईत गुन्हेगारांचा नंगानाच ; यवत पोलिसाकडून २४ व्यक्तींवर गुन्हा दाखल!

सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून दहशत पसरविल्याचा आरोप; महाराष्ट्र पोलीस अधिनियमासह भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई दहिहंडी उत्सवादरम्यान सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या आशयाची रील प्रसारित करणे आणि सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी दहिहंडी आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपी व त्यांच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र पोलीस…

Read Full News

पुरंदर विमानतळ जोडरस्त्यासाठी कोंढवा-भिवरी-सासवड मार्गाचे चौपदरीकरण करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाझरे सुपे, ता. पुरंदर (वार्ताहर – अनिकेत नितीन काळे) : पुणे जिल्ह्यातील वाढती वाहतूक, पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भविष्यातील औद्योगिक व व्यापारी विस्तार लक्षात घेता कोंढवा-भिवरी-सासवड या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण तातडीने करावे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे पुरंदर तालुका पश्चिम अध्यक्ष संदिप बबन कटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे….

Read Full News

बोपदेव घाट घाटातील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त

पुण्याहून सासवड कडे येताना बोपदेव घाट घाट ओलांडल्यानंतर ऑस्करवाडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकला जात असून त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याच्या लगतच मोठ्या पिशव्यांमध्ये कचरा येथे आणून टाकला जात आहे, यामध्ये शिल्लक वा खराब झालेले खाद्यपदार्थ, प्लास्टिक पिशव्या, याशिवाय मेलेल्या कोंबड्या आदी आरोग्यास धोकादायक कचरा या परिसरात टाकला जात असून त्यामुळे या परिसरातील…

Read Full News

मंगेश चिवटे हेच महायुतीकडून प्रबळ उमेदवार

पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिफारस करणार – भाजप आमदार राजेंद्र राऊत बार्शी – राज्यभरातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे हेच महायुतीकडून प्रबळ उमेदवार असून त्यांना आगामी पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळावी,यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण ठामपणे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भाजप आमदार राजेंद्र राऊत…

Read Full News

माळेगाव हद्दीत राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई; 380 लिटर गावठी दारू व दोन चारचाकी वाहनांसह 7.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी निर्मित गावठी दारूची बेकायदेशीर वाहतूक व साठा करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बारामती पथकाने मोठी कारवाई केली.या कारवाईत 380 लिटर गावठी दारू,दोन चारचाकी वाहने आणि चार मोबाईल संच असा एकूण 7 लाख 22 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार…

Read Full News

गडचिरोली ते नागपूर; सार्वजनिक उपक्रम समितीकडून आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली विकास प्रकल्पांची पाहणी

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष तथा दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्यानेतृत्वाखालील समितीने गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या तीन जिल्ह्यांचा आपला महत्त्वपूर्ण अभ्यास दौरा नुकताच पूर्ण केला. विदर्भातील औद्योगिक विकास, वन व्यवस्थापन, कौशल्य विकास उपक्रम, पायाभूत सुविधा, सिंचन प्रकल्प आणि विविध शासकीय महामंडळांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश…

Read Full News

क्रांतिवीर लहुजी सेने तर्फेबनगार्डन डिव्हिजन व पर्वती डिव्हिजन येथील महावितरण मधील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या विरोधात हांडी फोडो आंदोलन

पुणे शहर परिमंडल महावितरण मधील बंनगार्डन डिव्हिजन अंतर्गत व पर्वती डिव्हिजन अंतर्गत अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची हांडी फोडो आंदोलन रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालय समोर करण्यात आले होते. महावितरणचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य अभियंता.अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी क्रांतिवीर…

Read Full News

“धामणीत खंडोबा बाणाईचा शाही विवाह सोहळा जल्लोषात

मंचर :धामणी (तालुका आंबेगांव) येथील खंडोबा देवस्थान मंदिराच्या प्रांगणात पारंपारिक वाद्याच्या गजरात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शाही थाटात शुक्रवारी श्रावण पौर्णिमेनिमित्त”सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात.भंडारा खोबरे उधळून खंडोबा बाणाईचा विवाह सोहळा संपन्न झाला. शुक्रवारी पहाटे श्रावण पौर्णिमेला (राखी पौर्णिमा )खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अकरा जोडप्यांच्या हस्ते रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला.नंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती केली.त्यानंतर सेवेकरी दादाभाऊ…

Read Full News

येवलेवाडी येथे भटक्या-विमुक्त समाजांच्या पुनर्वसनाला सकारात्मक दिशा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे ठोस आश्वासन

विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने बैठक; जागेसह घरकुलासाठी शासकीय निधी, जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतः ₹१ लाख मदतीची घोषणा पुणे, दि. १२ सप्टेंबर २०२६ : पुणे जिल्ह्यातील भटक्या व विमुक्त जाती-जमातींमधील मरीआई, नाथपंथी डवरी गोसावी, भराडी, वासुदेव, गोंधळी आणि नंदीवाले या समाजघटकांतील निवाऱ्याविना व अत्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या पुनर्वसनाला आता सकारात्मक दिशा मिळाली आहे. येवलेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मरीआई…

Read Full News

शालेय फुटबॉल स्पर्धेत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे दैदिप्यमान यश!

१४ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; १७ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवडच्या विद्यार्थ्यांनी दिवे येथे दि.१० सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेतील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.१४ वर्षे…

Read Full News